पेटीएम : 4 तासानंतर प्ले स्टोअरवर परतले पेटीएम अॅप, ऑनलाइन जुगाराप्रकरणी गुगलने केली होती कारवाई


 

स्थैर्य, दि.१८: डिजीटल व्यवहारातील अग्रगण्य समजले जाणारे पेटीएम अ‍ॅपची गुगल प्ले स्टोअरवर वापसी झाली आहे. पेटीएमने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. गँबलिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे गुगलने पेटीएमला प्ले स्टोअरवरुन हटवले होते. आता चार तासानंतर परत पेटीएम प्ले स्टोअरवर वापस आले आहे.

ऑनलाइन कसीनोची परवानगी नाही – गुगल

दरम्यान, गुगलने म्हटले आहे की, ते ऑनलाइन कसीनोला परवानगी देऊ शकत नाही. तसेच, स्पोर्ट्स बेटिंगची सुविधा देणाऱ्या अवैध गँबलिंगचेही समर्थन नाही करणार. गुगलच्चा वाइस प्रेसीडेंट प्रोडक्ट, अँड्रॉयड सिक्योरिटी आणि प्रायवसी सुजैन फ्रेने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुगलच्या पॉलिसीजचे उल्लंघन करणाऱ्या अॅप्सला आम्ही प्ले स्टोअरमध्ये राहण्याची परवानगी देऊ शकत नाही.

गुगल-पे सोबत पेटीएमची टक्कर

पेटीएम देशातील सर्वात मुल्यवान स्टार्टअप्सपैकी एक आहे. गुगलचे पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल-पे सोबत पेटीएमची थेट टक्कर आहे. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये पेटीएमचा रेव्हेन्यू वाढून 3,629 कोटींवर पोहचला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!