पेटीएम पेमेंट्स बँकेची विक्रमी कामगिरी; महिन्याकाठी ९२६ दशलक्ष मासिक व्यवहार प्राप्त करणारी भारतातील पहिली बँक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । मुंबई । पेटीएम पेमेंट्स बँक लि. (पीपीबीएल) ही स्वदेशी बँक एकाच महिन्यामध्ये ९२६ दशलक्षांहून अधिक यूपीआय व्यवहारांचा मैलाचा टप्पा गाठणारी देशातील पहिली बेनिफिशियरी बँक ठरली आहे. या यशामुळे भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने विस्तारणारी यूपीआय बेनिफिशिअरी बँक म्हणून या बँकेचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे. व्यवहारांपोटी पैसे प्राप्त करणा-या खातेधारकाच्या बँकेला बेनिफिशियरी बँक असे म्हटले जाते. व्यवहारापोटी येणे असलेली रक्कम पेटीएम पेमेन्ट्स बँकेच्या खात्यात जमा होण्याला आणि तिचा वापर दररोजच्या पेमेंट्ससाठी किंवा बचतीसाठी करण्याला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.

ऑक्टो-डिसें’२० मध्ये झालेल्या ९६४.९५ दशलक्ष बेनिफिशिअरी व्यवहारांच्या तुलनेत ऑक्टो-डिसें’२१च्या तिमाहीमध्ये पीपीबीएलने एकूण २,५०७.४७ दशलक्ष बेनिफिशियरी व्यवहारांची नोंद केली. संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये (मे वगळता) सर्वात मोठी यूपीआय बेनिफिशिअरी बँक हे आपले स्थान बँकेने टिकवून ठेवले असून तिच्या व्यवहारांमध्ये दर महिन्याला आधीच्या महिन्याच्या तुलनेत वाढ होत आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेने यूपीआय पेमेंट्ससाठीची रेमिटर बँक म्हणूनही वेगाने मजल गाठली आहे. ऑक्टो-डिसें’२१च्या तिमाहीमध्ये बँकेकडे ४५५.७४ दशलक्ष रेमिटर व्यवहारांची नोंद झाली हा आकडा २०२० मधील याच कालावधीमध्ये झालेल्या व्यवहारांपेक्षा ६७.२६ टक्‍के अधिक आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे एमडी आणि सीईओ सतीश गुप्ता म्हणाले, “यूपीआय पेमेंटस्साठी सर्वाधिक पसंतीची बेनिफिशियरी बँक बनण्यामध्ये आमची मदत करणा-या आमच्या यूजर्सकडून मिळालेल्या या हुरुप वाढविणा-या प्रतिसादासमोर आम्ही नतमस्तक आहोत. सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सुसज्ज पायाभूत यंत्रणा आणि उच्च दर्जाचा डिजिटल बँकिंग अनुभव ग्राहकांना मिळावा यासाठी आमच्या टीमने केलेल्या कष्टांचेच हे द्योतक आहे. यापुढेही आपला अनुभव आणि तंत्रज्ञानाचे सामर्थ्य यांचा वापर करून ग्राहकांना अतिशय वेगवान यूपीआय मनी ट्रान्सफर सेवा आणि दररोजच्या पेमेंट्ससाठी पेटीएम वॉलेट आणि बँकखाते वापरण्याची सोय आम्ही ग्राहकांना पुरवित राहू.”

देशामध्ये डिजिटल पेमेंट्सच्या वाढीला वेग देण्याच्या कामी पेटीएम पेमेंट्स बँकेने निभावलेल्या कामगिरीचा भारत सरकारने अलीकडेच गौरव केला. व्यवहारांची संख्या, मर्चंट ऑनबोर्डिंग आणि व्यवहारांच्या यशस्वीतेचे प्रमाण या निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करणारी बँक म्हणून ‘डिजिटल पेमेंट्स उत्सवा’मध्ये बँकेला इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (MeitY) पुरस्कार देण्यात आला.

पेटीएम पेमेंट्स बँकेने अलीकडेच पेटीएम ट्रान्झिट कार्डही ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. हे एनसीएमसी म्हणजे भारतीयांना एकाच कार्डामध्ये आपल्या प्रवासाशी संबंधित सर्व व्यवहार करण्याची सुविधा देऊ करते. हे कार्ड उपलब्ध झाल्याने आता यूजर्सना वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी कार्डस् जवळ बाळगण्याची गरज उरणार नाही आणि आपल्या सर्व पेमेंटस्साठी फक्त पेटीएम ट्रान्झिट कार्ड वापरणे पुरेसे ठरेल.

पेटीएम पेमेंट्स बँक ही भारतात फास्टॅग्स जारी करणारी अग्रगण्य बँक आहे व देशातील सर्वाधिक टोल प्लाझा हस्तगत करणा-या बँकांपैकी एक आहे. पीपीबीएल फास्टॅग या टोल पेमेंट पद्धतीला देशामध्ये सर्वाधिक पसंती मिळत आहे, कारण त्यात यूजर्सना थेट आपल्या पेटीएम वॉलेटमधून पैसे भरता येतात. फास्टॅग्स वापरण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी त्यांना कोणतेही वेगळे खाते तयार करण्याची गरज भासत नाही.


Back to top button
Don`t copy text!