दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । मुंबई । जानेवारी २०२२ साठी नॅशनल पेमेण्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून मिळालेल्या डेटानुसार भारतातील स्वदेशी पेटीएम पेमेण्ट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) ने देशामधील युनायटेड पेमेण्ट इंटरफेस (यूपीआय) परिसंस्था व फास्टॅग विभागामधील अग्रस्थान कायम राखले आहे.
पीपीबीएलने जानेवारी २०२२ मध्ये ९५७.३९ दशलक्ष यूपीआय व्यवहारांची नोंद केली, ज्यामधून देशातील अव्वल यूपीआय बेनेफिशियरी बँक म्हणून आपले स्थान अधिक प्रबळ केले. पीपीबीएलद्वारे समर्थित पेटीएम यूपीआय अत्यंत गतीशील व सुरक्षित मनी ट्रान्सफर्स सेवा देते.
बँकेने जानेवारी २०२२ मध्ये ४.३ लाखांहून अधिक फास्टॅग जारी करून विभागामध्ये आपली प्रबळ उपस्थिती देखील कायम राखली. पेटीएम फास्टॅगप्रती प्रचंड लोकप्रियता दिसण्यात आली आहे, जेथे ही सेवा युजर्सना प्रत्यक्ष पेटीएम वॉलेटमधून देय रक्कम भरण्याची सेवा देत सोयीसुविधा देते. युजर्सना त्यांचे फास्टॅग्स रिचार्ज करण्यासाठी कोणतेही स्वतंत्र अकाऊंट उघडण्याची किंवा वॉलेट डाऊनलोड करण्याची गरज नाही.
पेटीएम पेमेण्ट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतिष गुप्ता म्हणाले, “आमचा ग्राहकांना सर्वोत्तम डिजिटल बँकिंग सेवा देण्याचा आणि आर्थिक समावेशनासाठी साधनांसह सक्षम करण्याचा मनसुबा आहे. आमच्या पेटीएम यूपीआय व पेटीएम फास्टॅग यासारख्या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामधून आम्ही देत असलेली प्रबळ तंत्रज्ञान पायाभूत सुविधा व एकसंधी डिजिटल बँकिंग अनुभव दिसून येतो. आम्ही सर्वांसाठी डिजिटल पेमेण्ट्समध्ये सुलभता आणण्याचे काम सुरूच ठेवण्याची आशा करतो.”
यूपीआय व्यवहारांसाठी अव्वल गंतव्य:
पीपीबीएलची बेनेफिशियरी बँक म्हणून यूपीआय परिसंस्थेमधील वाढीमधून निदर्शनास येते की अधिकाधिक ग्राहक आता दैनंदिन पेमेण्ट्स किंवा बचतींसाठी त्यांच्या पेटीएम पेमेण्ट्स बँकेमधून पैसा प्राप्त होण्याला पसंती देत आहेत.
यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये पीपीबीएल एकाच महिन्यामध्ये ९२६ दशलक्ष यूपीआय व्यवहारांचा टप्पा गाठणारी देशातील पहिली यूपीआय बेनेफिशियरी बँक बनली. नॅशनल पेमेण्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनसीपीआय) जारी केलेल्या नवीन डेटानुसार या बँकेने यूपीआय व्यवहारांसाठी आघाडीची रेमिअर बँक म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.
नुकतेच देशामध्ये डिजिअल पेमेण्ट्सच्या विकासाला चालना देण्यामध्ये बजावलेल्या भूमिकेसाठी भारत सरकारने पीपीबीएलचा सन्मान केला आणि व्यवहारांचे आकारमान, मर्चंट ऑनबोर्डिंग आणि व्यवहार यशस्वी दरासंदर्भात अव्वल परफॉर्मर म्हणून पुरस्कारित केले.
फास्टॅगसची आघाडीची जारीकर्ता:
जानेवारी २०२२ मध्ये पेटीएम पेमेण्ट्स बँकेने ४.३ लाखांहून अधिक फास्टॅग्स जारी केले, ज्यामधून विभागामधील त्यांची प्रबळ उपस्थिती दिसून येते.
पेटीएम फास्टॅगची लोकप्रियता वाढत आहे, ज्यामध्ये बँकेने किमान कागदपत्रव्यवहार, त्वरित कार्यसंचालन आणि उच्च दर्जाचा कस्टमर केअर सपोर्टवर दिलेला भर साह्य करत आहे. पेटीएम फास्टॅग युजर्ससाठी पसंतीचे माध्यम बनले आहे, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पेटीएम वॉलेटमधून देय रक्कम भरण्याची सुविधा मिळते आणि रिचार्जसाठी कोणतेही स्वतंत्र अकाऊंट निर्माण करण्याची गरज भासत नाही.
फास्टॅग व्यवसायाने बँकेला नवीन युजर्सना ऑन-बोर्ड करण्यामध्ये मदत करण्याव्यतिरिक्त महसूलामध्ये लक्षणीयरित्या वाढ करण्यामध्ये मदत केली आहे. पीपीबीएलने आतापर्यंत १.२९ कोटीहून अधिक फास्टॅग्स जारी केले आहेत, जे ऑथोराईज्ड बँकांनी जारी केलेल्या संयोजित फास्टॅग्सच्या आकडेवारीपेक्षा सर्वोच्च आहे.
पीपीबीएल नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) प्रोग्रामसाठी टोल प्लाझांची सर्वात मोठी प्राप्तकर्ता देखील आहे, ज्याद्वारे इंटरऑपरेबल देशव्यापी टोल पेमेण्ट सोल्यूशन दिले जात आहे. पीपीबीएल राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील २०० हून अधिक टोल प्लाझांना डिजिटली टोल शुल्क गोळा करण्यामध्ये मदत केली आहे.