पेटीएम पेमेंट्स बँकेने ७ दशलक्ष व्हिसा कार्ड्स जारी केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । मुंबई । भारताच्या स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँकेने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्यांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून सात दशलक्ष व्हिसा डेबिट कार्ड्स जारी केली असल्याची घोषणा केली आहे. बँकेने विकसित केलेल्या नवोन्मेष्कारी उत्पादनांचा प्रबळ अवलंब आणि भारतामध्ये स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल पेमेंट्समुळे आर्थिक वर्ष २०२१मध्ये एक दशलक्ष व्हिसा कार्ड्स जारी करण्याचे लक्ष्य संपादित केले आहे.

यासह बँकेने युजर्सना डिजिटल पेमेंट्ससंदर्भात सक्षम करत आणि आर्थिक सेवा उपलब्ध करून देत भारतातील आर्थिक समावेशनाला चालना देणे सुरूच ठेवले आहे. कार्डधारकांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी बँकेने यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या व्हिसा डेबिट कार्डसचा वापर करत आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास सक्षम केले होते. बँक कार्डसाठी अर्ज करण्यासोबत अपडेट्सवर देखरेख ठेवण्यासाठी पूर्णत: डिजिटल प्रक्रियेची सुविधा देखील देते.

पेटीएम पेमेंट्स बँक लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश गुप्ता म्हणाले, “आम्ही आर्थिक समावेशनाला चालना देत आहोत आणि भारतीयांना सर्वोत्तम डिजिटल बँकिंग उत्पादने उपलब्ध करून देण्याची खात्री घेत आहोत. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा कार्डसाठी वाढत्या मागणीमधून बँकेची उत्पादने व सेवांची व्यापक पोहोच व अवलंबता दिसून येते.”

व्हिसा इंडियाच्या व्यवसाय विकासाचे प्रमुख सुजय रैना म्हणाले, “व्हिसामध्ये आम्हाला भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या सुलभ अवलंबतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा आनंद होत आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेसोबतचा आमचा सहयोग याचे उत्तम उदाहरण आहे आणि हा सहयोग अधिकाधिक दृढ होत जात लाखो ग्राहकांना प्रत्यक्ष व व्हर्च्युअल स्वरूपांमध्ये सर्वसमावेशक व्हिसा डेबिट कार्डसह सक्षम करत आहे. बँकेची पोहोच व उत्पादन तत्त्व तसेच व्हिसा क्रेडेन्शियल्सच्या व्यापक स्वीकार्हतेसह आम्हाला हा सहयोग नवीन ग्राहकांच्या सहभागाला आणि डिजिटल पेमेंट्सच्या लाभाला चालना देत राहण्याची अपेक्षा आहे.”

पेटीएम पेमेंट्स बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक प्रयत्न केले आहेत. यापूर्वी बँकेने पेटीएम ट्रान्झिट कार्ड देखील सादर केले होते, जे एनसीएमसी इंटर-ऑपरेबल फिजिकल मोबिलिटी कार्ड म्हणून काम करते, ज्यामुळे लाखो भारतीयांना सोयीसुविधा मिळण्यासोबत सरकारच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ उपक्रमाला चालना मिळते. पेटीएम ट्रान्झिट कार्ड भारतीयांना मेट्रो, रेलवे, राज्य-मालकीच्या बस सेवांमधील प्रवास, टोल व पार्किंग शुल्कांपासून ऑफलाइन मर्चंट स्टोअर्स, ऑनलाइन शॉपिंग यासाठी पेमेंट्स भरण्यापर्यंत त्यांच्या दैनंदिन गरजांकरिता एकच फिजिकल कार्ड देते.


Back to top button
Don`t copy text!