पेटीएम पेमेंट्स बँकेने ‘यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्ड’ सादर केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । भारतातील स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) ने यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे, ज्यामुळे ग्राहक व व्यापारी या दोघांसाठी पेमेंट अनुभवामध्ये वाढ झाली आहे. यासह बँकेने वापरकर्त्यांना रूपे क्रेडिट कार्ड्सच्या मोठ्या स्वीकृतीच्या माध्यमातून सोईस्कर पेमेंट्ससह सक्षम केले आहे, ज्यामुळे भारतातील क्रेडिट कार्ड इकोसिस्टम अधिक प्रबळ झाली आहे.

यूपीआयवरील रूपे क्रेडिट कार्ड्सच्या लिंकेजसह ग्राहकांना त्यांचे क्रेडिट कार्ड्स वापरण्याच्या अधिक संधींमधून फायदा मिळेल आणि व्यापा-यांना क्यूआर कोड्स सारख्या अॅसेट्सचा वापर करत क्रेडिट कार्ड्सच्या स्वीकृतीसह क्रेडिट इकोसिस्टमचा भाग बनत वापरामध्ये वाढ होण्याचा फायदा मिळेल. पेटीएम पेमेंट्स बँक सर्वात मोठी व्यापारी संपादित व लाभार्थी बँक आणि आघाडीची रेमिटर बँक म्हणून यूपीआयमध्ये अग्रस्थानी आहे. रूपे क्रेडिट कार्डवर यूपीआय पेमेंट्सचे सादरीकरण ग्राहकांना सर्वोत्तम वैशिष्ट्ये देण्याच्या बँकेच्या नवोन्मेष्कारी प्रवासामधील आणखी एक पाऊल आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वापरकर्त्यांसाठी डिजिटली सक्षम क्रेडिट कार्ड लाइफसायकल अनुभवासाठी यूपीआयसह रूपे क्रेडिट कार्ड लिंक करण्यास मान्यता दिली. एकसंधी व सुरक्षित व्यवहारांसाठी, वापरकर्त्यांनी त्यांचे रूपे क्रेडिट कार्ड त्यांच्या यूपीआय आयडीशी लिंक करणे आवश्यक आहे. रुपे क्रेडिट कार्डला यूपीआय आयडीशी लिंक केल्यानंतर वापरकर्ते फक्त पेटीएम अॅपद्वारे यूपीआय-सक्षम क्यूआर कोड स्कॅन करून व्यापा-यांना पैसे देऊ शकतात, यामुळे कार्ड नेहमी सोबत असण्याची गरज दूर होते. रूपे क्रेडिट कार्डशी लिंक केलेल्या यूपीआय आयडीचा वापर करून व्यवहार करता येतील, ज्यामुळे ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पेमेंट जलद होतील.


Back to top button
Don`t copy text!