दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । मुंबई । भारतातील प्रमुख डिजीटल पेमेंट आणि अर्थसेवा कंपनी वन ९७ कम्युनिकेशन लिमिडेटने प्रधानमंत्री संग्रालयाचे पेटीएम अधिकृत डिजीटल सहयोगी ठरल्याचे जाहीर केले. वन ९७ कम्युनिकेशन ही पेटीएम ब्रँडची पालक कंपनी आहे. प्रधानमंत्री संग्रालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेटीएम ईडीसीद्वारे (इलेक्ट्रॉनिक डेटा कॅप्चर्ड) पहिले तिकीट खरेदी केले.
राजधानी दिल्लीत उद्घाटन झालेले हे प्रधानमंत्री संग्रालय पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी खुले होत आहे. हे संग्रालय भारतातील पंतप्रधानांना समर्पित असून स्वातंत्र्यानंतरचा ऐतिहासिक प्रवास येथे साकारण्यात आला आहे. अधिकृत सहयोगी म्हणून पेटीएमद्नारे पेमेंट गेटवे, ईडीसी आणि क्यूआर कोड असे पेमेंटचे पर्याय देण्यात आले आहेत. जेणेकरुन येथे भेट देणार्या पर्यटकांना व्यवहार जलद, सुलभतेने आणि सुरक्षितपणे करता येतील..पेटीएम पेमेंट गेटवे, ईडीसी, आणि क्यूआर कोडद्वारे यूजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड, भीम यूपीआय, नेटबॅकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार सुलभतेने करता येतील.
वन ९७ कम्युनिकेशन ही ऑफलाईन पेमेंट बिझनेसमधील प्रमुख कंपनी आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने अंदाजे २९० कोटी नवे डिव्हाईसेस प्रस्थापित केले होते. दरदिवशी अंदाजे १००० डिव्हाईसेस प्रस्थापित केले जातात. यासंदर्भात पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री संग्रालयाचे अधिकृत डिजीटल पेमेंट सहयोगी बनताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कारण यामुळे देशातील आतापर्यंत होऊन गेेलेल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्याची आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याची संधी यादवारे मिळणार आहे. पेटीएम पेमेंट पर्यायामुळे यूजर्सना संग्रालयाचे डिजीटल तिकीट सुरक्षितरित्या खरेदी करता येणार आहे.
आर्थिक वर्ष २०२२ च्या शेवटच्या तिमाहीमध्ये पेटीएमच्या व्यवसाय वृद्धीत उल्लेखनीय वाढ झाली. या तिमाहीत ६.५ दशलक्ष कर्ज वितरण करण्यात आले. (वार्षिक वाढ ३७४ टक्के) ज्याचे भारतीय कर्ज मूल्य अंदाजे ३५५३ कोटी रुपये (४१७ टक्के – वार्षिक वाढ), जीएमव्ही मध्ये १०४ टक्के वार्षिक वाढ अंदाजे २.५९ लाख कोटी (३४.५ अब्ज) आणि मासिक व्यवहार करणार्या वापरकर्त्यांमध्ये ४१ टक्के म्हणजे ७०.९ दशलक्ष झाली आहे.