दैनिक स्थैर्य । दि.११ एप्रिल २०२२ । मुंबई । भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकी असलेले वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) ईरक्तकोषचा समावेश करणारे पहिलेच अॅप बनले आहे. ईरक्तकोष हे नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेले केंद्रीयकृत रक्तपेढी व्यवस्थापन अॅप आहे. यामधून पेटीएमची आपल्या अॅपवर अनेक आरोग्यसेवा सुविधा सुलभपणे उपलब्ध करून देत नागरिक कल्याणाला पाठिंबा देण्याप्रती सातत्यपूर्ण कटिबद्धता दिसून येते.
सी-डीएसीने निर्माण केलेले ईरक्तकोष व्यासपीठ देशभरातील २,१०० हून अधिक रक्तपेढ्यांचा कार्यप्रवाह कनेक्ट, डिजिटाईज व स्ट्रिमलाइन करणारा उपक्रम आहे. ईरक्तकोष वैशिष्ट्यासह पेटीएम युजर्स रक्तपेढ्यांच्या व्यापक श्रेणीबाबत माहिती मिळवण्यासोबत रिअल-टाइममध्ये माहिती शेअर करू शकतील. हे वैशिष्ट्य पेटीएम युजर्सना संपर्क माहिती पाहण्यासोबत त्यांच्याजवळ असलेल्या रक्तपेढीचा शोध घेण्यामध्ये देखील मदत करेल.
ईरक्तकोष अॅप नागरिकांना विविध रक्तपेढ्यांमध्ये असलेल्या रक्त साठ्याबाबत माहिती मिळण्यामध्ये मदत करण्यासाठी भारत सरकारने विकसित केले. या समावेशनासह पेटीएमने त्यांच्या अॅपवर पेटीएम हेल्थ विभागामध्ये लाखो युजर्ससाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल आरोग्यसेवा सुविधांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीमध्ये वाढ केली आहे.
पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, “आम्ही आमच्या सर्व युजर्ससाठी डिजिटल आरोग्यसेवा विनासायास उपलब्ध करून देण्याशी कटिबद्ध आहोत आणि त्याच दिशेने नवीन प्रयत्न म्हणून पेटीएम अॅपवर ईरक्तकोष वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे. हे वैशिष्ट्य आपत्कालीन स्थितींमध्ये लोकांना देशभरातील हजारो रक्तपेढींमध्ये उपलब्ध असलेल्या प्लाझ्माबाबत जलदपणे माहिती मिळण्यासोबत रिअल-टाइममध्ये माहिती शेअर करण्याची सुविधा देत त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये धावपळ करण्याची गरज पूर्णत: कमी होईल.”
ईरक्तकोष वैशिष्ट्याव्यतिरिक्त पेटीएम हेल्थ अनेक सार्वजनिक आरोग्य सुविधा, कोविड-संबंधित सेवांसह ऑनलाइन लस व बूस्टर डोस नोंदणी, लस प्रमाणपत्र, सवलतीच्या दरामध्ये ऑनलाइन औषधे ऑर्डर, डॉक्टरांचा सल्ला, स्पेशालिटी तपासण्या, लॅब टेस्ट बुकिंग्ज आणि आरोग्य विमा अशा सुविधा देखील देते.