पेटीएमने व्हिसा, मास्टरकार्ड आणि रूपेच्या माध्यमातून २८ दशलक्ष कार्ड्सचे टोकनायझेशन पूर्ण केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । मुंबई । भारताची अग्रगण्य डिजिटल पेमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिस कंपनी असलेल्या पेटीएम ब्रॅण्डची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आरबीआय सुरू केलेल्या कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये लक्षणीय प्रगती केल्याची घोषणा आज केली. ग्राहकांसाठी ऑनलाइन कार्ड व्यवहार सुरक्षित आणि संरक्षित करण्यासाठीच्या या प्रयत्नांचा भाग म्हणून कंपनीने व्हिसा, मास्टरकार्ड आणि रूपे यांची २८ दशलक्ष कार्ड्स टोकनाइझ केली आहेत. या वेगवान प्रगतीमुळे पेटीएमला आरबीआयने दिलेल्या अंतिम मुदतीच्या आधीच सेव्ह केलेल्या कार्ड डेटाचे विशुद्धीकरण करणे शक्य होणार आहे. पेटीएम अॅपवरील मासिक सक्रिय कार्डांमधील टोकनाइझ्ड कार्डसचे प्रमाण ८० टक्के आहे. यामुळे ग्राहकांना लवकरात लवकर चेकआउट करण्याची सोय मिळणार आहे तसेच व्यवहार यशस्वी होण्याचे प्रमाण सेव्ह केलेल्या कार्डांइतकेच किंवा त्याहूनही अधिक असणार आहे.

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले, “पेटीएम सुरक्षित आणि संरक्षित ऑनलाइन पेमेंट्स सेवा देण्याशी कटिबद्ध आहे आणि याच दिशेने आरबीआयने टोकनायझेशनसाठी सुरू केलेले प्रयत्न हा या उद्योगक्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कार्डांचे टोकनायझेशन करण्याची गरज आम्ही ओळखली आणि आमच्या पेटीएम अॅपवर ही प्रक्रिया राबवली. त्याला प्रचंड यश मिळत आहे. भारतीय पेमेंट यंत्रणा ऑनलाइन मंचावर आणण्याच्या कामी या प्रयत्नांचे दूरगामी परिणाम होणार आहेत तसेच त्यामुळे ग्राहकांसाठी या व्यवहारांची विश्वासार्हता आणि सुरक्षितता वाढणार आहे.”

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व ऑनलाइन व्यापारी/ई-कॉमर्स स्टोअर्सना ३० जून २०२२ पर्यंत कार्ड-ऑन-फाइन टोकनायझेशन या प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.


Back to top button
Don`t copy text!