दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । मुंबई । डिजिटल पेमेंट आणि वित्त सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी पेटीएमने चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीदरम्यान प्रबळ विकास गती कायम ठेवली आहे. पेटीएमने आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून २.७ दशलक्ष कर्ज वितरण केले असून यात वार्षिक ४१४ टक्के वाढीची नोंद केली आहे. कर्ज वितरण मूल्य १३.२ बिलियन रुपयांवर पोहोचले असून यात वार्षिक ३७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या जीएमव्हीमध्ये वार्षिक १२९ टक्के वाढ आणि एमटीयूमध्ये वार्षिक ३६ टक्के वाढ झाली आहे.
दुस-या तिमाहीमध्ये पेटीएमचा कार्यसंचनांमधून प्राप्त महसूल वार्षिक ६४ टक्क्यांच्या वाढीसह १०,८९६ दशलक्ष रूपयांपर्यंत स्थिरगतीने वाढला आहे. योगदान लाभ मागील वर्षाच्या तुलनेत ५८६ टक्क्यांनी वाढून २,६०५ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला असून मासिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स आकडेवारी वार्षिक ३३ टक्क्यांच्या वाढीसह ५७.४ दशलक्षापर्यंत पोहोचली आहे.