दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२३ । बारामती । अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मा. नगरसेवक अतुल बालगुडे यांच्या फ्लेक्स वरून सध्या जोरदार महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर (रविवार ०२ जून २०२३) राज्यात व विशेषतः बारामती मध्ये त्यांच्या अभिनंदनाचे प्लेक्स चौका चौकात लागले त्यामध्ये लक्ष वेधून घेणारा फ्लेक्स म्हणजे देसाई इस्टेट च्या मुख्य प्रवेशद्वार व देवीचे मंदिर शेजारी लावलेला फ्लेक्स होय या मध्ये शरद पवार यांचे नाव व फोटो नाही फक्त अजित पवार यांचे फोटो आहे त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
तत्पूर्वी अतुल बालगुडे व कार्यकर्त्यांनी फटाके उडवून व पेढे वाटून अजित पवार यांच्या निवडीचे स्वागत केले. ” आमचे दैवत अजितदादा असून त्यांनी बारामती च्या वैभवात विकासात भर पाडली असून अजित दादा सांगतील ते धोरण व बांधतील ते तोरण अशी आमची भूमिका आहे” अशी प्रतिक्रिया अतुल बालगुडे यांनी दिली.
दरम्यान अजित पवार यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्त्या समवेत अतुल बालगुडे मुंबई कडे रवाना झाले व अजित पवार यांची भेट घेऊन दादांना पाठींबा असल्याचे भेटून सांगितले.
एकेकाळी बारामती मध्ये राजकीय पंढरीत विठोबा म्हणून शरद पवार साहेबाचे नाव व फोटो असायचा परंतु सद्या फोटो व नाव नसून फक्त दैवत म्हणून अजित पवार यांचा फोटो व निवडी बदल अभिनंदन अशी शब्द रचना असल्याबद्दल सर्वत्र या फ्लेक्स ची जोरदार चर्चा आहे.