पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2026 साठी मंडप उभारणीला प्रारंभ


सातारा- प्रदर्शनाच्या भव्य मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, 4 मार्च, सातारा : येथील पोलीस कवायत मैदानावर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना अंतर्गत विभागीय प्रदर्शन आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2026 याचे आयोजन करण्यात आले आहे .आयोजित केलेल्या भव्य कृषी प्रदर्शनासाठी मंडप उभारणीला प्रारंभ झाला आहे .विविध मान्यवरांच्या उपस्थित या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा पूजन सोहळा संपन्न झाला या प्रदर्शनामध्ये दिनांक 7 मार्च ते नऊ मार्च सातारा जिल्ह्यातील समस्त नागरिकांना मोठी पर्वणी लाभली असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या पौष्टिक तृणधान्य महोत्सवात ग्रामीण उद्योगांना बाजारपेठ, स्थानिक ब्रँडला ओळख ,रोजगार निर्मिती ,महिला सक्षमीकरण ,शेतमालाला मूल्यवर्धन मिळणार आहे.

कृषी महोत्सव तथा कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सातारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे- पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी ,संयोजक सोमनाथ शेटे करत आहेत.सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना उत्पादनांचे थेट मोठ्या खरेदीदारांसमोर सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नवीन व्यवसाय संधी आणि निर्यात प्रक्रियेबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी वअन्न प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण व स्वच्छतेच्या मानकांविषयी माहिती मिळणार आहे.

हे संमेलन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि थेट खरेदी विक्रीचे करार करण्यासाठी महत्वपुर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
कृषी प्रदर्शन तथा महोत्सवासाठी श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंह भोसले हे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. सातारा जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रियाताई महेश शिंदे उपस्थित राहणार आहेत.सातारकरांच्या खास आग्रहास्तव पुन्हा भव्य सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे .

खरेदीदार आणि विक्रेते एकाच व्यासपीठावर समोरासमोर भेटणार ऑन स्टेज खरेदी विक्री करार संधीचा नवा इतिहास घडणार आहे,सातारा ,सांगली ,कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पी एम एफ योजनेतील दर्जेदार उत्पादने आणि ब्रँड चे भव्य प्रदर्शन आहे.आधुनिक प्रोसेसिंग मशिनरी उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.अन्न भेसळ प्रात्यक्षिक,शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री सुवर्णसंधी मिळणार आहे

तसेच या पौष्टिक तृणधान्य महोत्सवात मिलेटस प्रक्रिया उत्पादने आणि पौष्टिक पदार्थाची खरेदी निश्चिती यामध्ये शतावरी बिस्कीट, सोयाचंक, बटरस्कॉच सरबत, जांभूळकर, मोरिंगा लाडू, पुरणप्रीमिक्स, मसाला काजू ,टोमॅटो पापड, ज्वारी पफ, बाजरी प्रीमिक्स, भाजलेले काजू, गन्ना मिल्क चॉकलेट, जाम, जेली, चॉकलेट्स, औषधी वनस्पती पावडर, पालक आणि तांदळाचे पापड, सातारी मसाले, शुद्ध नैसर्गिक मध, भाजलेले सोयाबीन सोया नट झटपट घरगुती आणि वेळ वाचवणारे पदार्थ आणि बरेच काही या पौष्टिक तृणधान्य महोत्सवात मिळणार आहे .तरी दिनांक 7 ते 9 मार्च मधील एक दिवस नक्की राखून ठेवा आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2026 ला अवश्य भेट द्या.


Back to top button
Don`t copy text!