स्थैर्य, सातारा, दि.१८: खटाव येथील शमशुद्दीन याकूब मुल्ला (८१) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. मधुमेह व मुत्रपिंडाच्या आजाराशी ते मागील काही वर्षांपासून झुंजत होते. आज खटाव येथे कोविड १९ वैश्विक महामारीच्या पार्श्वभुमिवर नियमांचे पालन करुन धार्मिक रितिरिवाजाप्रमाणे दफन करण्यात आले. पत्रकार रफिक मुल्ला यांचे ते वडील होते.
महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागात चाळीस वर्षे नोकरी करून ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते खटाव येथे सामाजिक कार्यात अग्रेसर होते. मुस्लिम समाजाचे संघटन व विकास यासाठी सेवानिवृत्तीनंतर कार्यरत राहिले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परीवार आहे.