कोविड लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळ न दवडता खाजगी डॉक्टर्सनी कोविडचाच उपचार करावा, इतर उपचार करून रुग्णाला धोक्यात घालू नये – जिल्हाधिकारी शेखर सिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०१: सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टर मात्र लक्षणं असूनही इतर उपचार करतात पर्यायाने रुग्णाचा संसर्ग वाढतो आणि रुग्णास धोका पोहचतो असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे खाजगी डॉक्टरांनी कोविड उपचार करावेत अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. रुग्णांमध्ये कोविड लक्षणे दिसत असल्यास अशा रुग्णांना खासगी डॉक्टरांनी प्रथम कोरोना टेस्ट करण्याबाबत सक्तीने सांगावे त्यांनतरच योग्य ते उपचार करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांकडे कोरोनाच लक्षणे असणारा रुग्ण आल्यास त्याच्यावर कोविड प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत अथवा शासकीय रुग्णालयाकडे पाठवावे. असे न केल्यास जिल्हा प्रशासनाकडून अशा खासगी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, आणि जिल्ह्यात तसे गुन्हे नोंदविले आहेत असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!