दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । कृष्णामाई मेडिकल रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून निकोप हॉस्पिटल चालविताना डॉ. जे. टी. पोळ आणि त्यांचे सहकारी खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करीत अत्यवस्थ रुग्ण दाखल करताना त्याच्या नातेवाइकांच्या मानसिकतेचा विचार करुन त्यांना आधार देत रुग्णावर उपचार करण्याची येथील पद्धत प्रेरणादायी असून रुग्ण व नातेवाईकांना डॉक्टर नव्हे देव भेटल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर मोफत डायलेसिस, एन्जोप्लास्टी व कोविड लसीकरण शिबीर उदघाटन प्रसंगी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी डॉ. जे. टी. पोळ, डॉ. सौ. सुनिता पोळ, डॉ. तेजस भगत, डॉ. अभिनया राऊत, डॉ. बी. के. यादव, डॉ. जयंत गावडे, डॉ. विश्वनाथ निकम, डॉ. स्नेहल खोमणे, डॉ. अश्विनी पिसाळ हॉस्पिटलचे जनसंपर्क व प्रशासन अधिकारी संदीपकुमार जाधव यांच्या सह हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईक आणि शहरवासीय उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. जे. टी. पोळ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवसानिमित्त यथोचित सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्तविकात दि. १९ फेब्रुवारी ते दि. २८ मार्च रोजी दररोज दुपारी १:०० ते सायंकाळी ४:०० यावेळेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत डायलेसिस, एन्जोप्लास्टी व कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात येत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. जे. टी. पोळ यांनी यावेळी केले.
प्रशासन व जनसंपर्क अधिकारी संदीपकुमार जाधव यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले