स्थैर्य, फलटण दि.7 : निंबळक (ता.फलटण) येथे सुरु करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात देण्यात येणार्या सोई-सुविधांबाबत येथे उपचारार्थ दाखल होणारे रुग्ण अत्यंत समाधानी असून 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतरही रुग्ण पुढील काही दिवस विलगीकरण कक्षातच घालवण्यात तयारी दर्शवत आहेत.
कोरोना विलगीकरण कक्षात दाखल होयला अनेक कोरोनाबाधित धजावत असतात. मात्र निंबळक येथील कोरोना विलगीकरण कक्षात देण्यात येणार्या सुविधा, उपचार करणारे डॉक्टर्स, मोफत औषध पुरवठा, चहा, नाष्टा, जेवणाची उत्तम सोय, भक्तीगीते ऐकण्याची सुविधा, लाईटची उत्तम सोय, स्वच्छता आदींमुळे येथील दाखल रुग्ण विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतरही पुणे आणखीन काही दिवस राहण्याची आपली तयारी असल्याचे बोलून दाखवत असत या सुविधांबद्दल निंबळक गावचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांच्यासह सरपंच राजेंद्र मदने आदींना धन्यवाद देत आहेत.
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सचिन चव्हाण, महेश निंबाळकर आदींचे याकामी मोलाचे योगदान मिळत आहे.