दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
हनुमाननगर, कोळकी (ता. फलटण) येथील वसुंधरा पार्कनजीकचा हा रस्ता गेल्या चार महिन्यांपासून दयनीय झाला आहे.
या रस्त्यावर पाऊस पडला की चिखल होतो. चालत जाता-येता देखील लोक येथे घसरून पडतात, गाड्याही घसरतात. याबाबत ग्रामपंचायतीला लोकांनी सांगूनही चार महिन्यांपासून मुरूम टाकण्यात येईल, असे सांगितले जात आहे, मात्र तेसुध्दा ग्रामपंचायतीला झालेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराज असून लवकरात लवकर हा रस्ता मुरूम टाकून लोकांना जाण्या-येण्या योग्य करावा, अशी मागणी होत आहे.