
दैनिक स्थैर्य । 27 मे 2025। सातारा । पाटण तालुक्यातील पाथरपुंजगावाने 31 मे 2024 ते 1 जून 2025 या कालावधीत 7,359 मिलिमीटर पावसाची नोंद करत महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या आकड्या पाथर पुंजने देशातील प्रसिद्ध चेरापुंजीलाही (5,938 मिमी) मागे टाकले आहे.जून ते ऑगस्ट 2024 या तीन महिन्यांत पाथरपुंजमध्ये 7,359 मिमी पावसाची नोंद झाली, तर 2019 मध्ये याच गावाने 9,956 मिमी पावसाचा विक्रम नोंदवला होता. यंदाचा आकडा पुन्हा त्या दिशेने वाटचाल करत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या बाबतीत पाथरपुंज अव्वल असून, त्यापाठोपाठ वाळवण (6,738 मिमी), नवजा (6,250 मिमी), दाजीपूर (6,203 मिमी), निवळे (6,026 मिमी) आणि महाबळेश्वर (5,962 मिमी) यांचा क्रमांक लागतो. हवामान बदलामुळे या भागात पावसाची तीव्रता आणि प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पाथरपुंज आता केवळ ’पावसाचे गाव’ न राहता हवामान अभ्यासकांचे लक्ष वेधणारे केंद्र बनले आहे.