फलटणला पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करा; खासदार धैर्यशील मोहिते – पाटलांची मंत्री ज्योतिरादित्य शिंदेकडे केली मागणी


दैनिक स्थैर्य | दि. 25 जुलै 2025 । फलटण । फलटण तालुक्यातील नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित गरजा लक्षात घेऊन, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि फलटण शहरात पासपोर्ट सेवा केंद्र (पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र – POPSK) स्थापन करण्याची मागणी केली.

ही मागणी केल्यामुळे भविष्यात फलटणच्या नागरिकांना पासपोर्ट संबंधित कामांसाठी बारामती किंवा पुण्याला जाण्याचा हेलपाटा टाळता येणार आहे. पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने नागरिकांना या सेवा मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. POPSK स्थापन झाल्यास, नागरिकांना स्थानिक पातळीवरच पासपोर्ट सेवा मिळेल आणि त्यांच्या वेळेची बचत होईल.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीत आपल्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी केलेली ही मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रस्तावाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.


Back to top button
Don`t copy text!