
दैनिक स्थैर्य । 6 जून 2025। सातारा। सातारा ते रेल्वे स्टेशन शटल एसटी बससेवा गेल्या सात महिन्यांपासून बंद झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी आणि असुरक्षित वाहतुकीचा अवलंब करावा लागत असताना, प्रचंड आर्थिक लूटही सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा आगाराला ही शटल बससेवा तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी सातारा रेल्वे प्रवासी संघ आणि सातारा रेल्वे स्थानक स्थानिक सल्लागार समितीच्या माजी सदस्यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
सातारा रेल्वे स्टेशन हे जिल्हास्तरीय असल्याने येथे 24 तासांत 17 रेल्वे गाड्या येतात आणि जातात. यामधून राज्य व परराज्यात जाणार्या, येणार्या प्रवाशांची, तसेच नियमितपणे ये-जा करणारे शासकीय,खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगार, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या दोन ते अडीच हजारांवर आहे. सध्या उन्हाळी सुटी असल्यामुळे 24 तासांत ही प्रवासी संख्या अंदाजे तीन हजारांवर जात आहे. या प्रवाशांना सातारा शहरात येण्यासाठी वा रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी बससेवा नसल्याने सुरू नाइलाजाने खासगीएसटी प्रशासनाने आडमुठेपणा सोडून नियमितपणे प्रत्येक तासाला राजवाडा बस स्थानकमार्गे रेल्वे स्टेशन शटल बस सुरू ठेवली असती, तर एसटी प्रशासनाला आर्थिक फायदा होऊन रेल्वे प्रवाशांची गैरसोयही दूर झाली असती. वाहनाने ये-जा करावी लागते. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते, तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन सातारा रेल्वे स्थानक सल्लागार समितीने महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रकांना वेळोवेळी समक्ष भेटून, लेखी निवेदने देऊन रेल्वे स्टेशन शटल बस सुरू करण्याची विनंती केली होती. माजी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक, जिल्हाधिकारी यांनीही वेळोवेळी आलेल्या मागणीच्या अनुषंगाने सातारा विभाग नियंत्रकांना दूरध्वनी, लेखी पत्राद्वारे शटल बससेवा नियमितपणे सुरू करण्याचे आदेश दिले होते.
निवेदनावर सातारा रेल्वे प्रवासी संघ आणि सातारा रेल्वे स्थानक स्थानिक सल्लागार समितीचे माजी सदस्य विकास कदम, हसमुख पटेल, किशोर शेंडे, नितीन शिंदे, हेमंत जाधव, मधुकर शेंबडे, दत्तात्रय सुतार यांच्या सह्या आहेत.