पारूल युनिव्हर्सिटीचा ईजबझसह सहयोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । मुंबई । गेल्या दोन वर्षांत भारताच्या शिक्षण क्षेत्रात अध्यापनापासून ते परीक्षा आणि मूल्यमापनापर्यंत डिजिटायझेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले. आता शिक्षण संस्था त्यांचे प्रशासन आणि फी व्यवस्थापन देखील डिजिटल रूपात बदलत आहेत. भारतातील अग्रगण्य खाजगी युनिव्हर्सिटींपैकी एक पारुल युनिव्हर्सिटीने खर्चामध्ये ७० टक्के कपात आणि फी संकलन चक्रामध्ये ६० टक्के वाढ केली आहे. यामागील कारण म्हणजे त्यांनी ईजबझच्या मदतीने संपूर्ण फी संकलन प्रक्रिया डिजिटल केली आहे.

पारुल युनिव्हर्सिटी त्यांची फी संकलन प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी ईजबझच्या फीजबझ सोल्यूशन्सचा वापर करत आहे. युनिव्हर्सिटीच्या फी संकलनाच्या मॅन्युअल प्रक्रियेमध्ये ९० टक्के घट झाली आहे.

पारूल युनिव्हर्सिटीचे स्टुडण्ट वेल्फेअरसाठी डीन ध्रुविल शाह म्हणाले, “आम्ही ईजबझसह आमच्या फी संकलन प्रक्रियेत प्रचंड सुधारणा पाहिल्या आहेत, कारण त्यांनी आमच्यासाठी ही प्रक्रिया स्वयंचलित करण्यासोबत डिजिटायझेशन केले आहे. पालकांसाठी देखील फी भरण्याचा हा एक सुरक्षित, जलद व सोपा मार्ग बनला आहे. फी रिफंड, डिफॉल्ट, आणि बॅच किंवा अभ्यासक्रमांनुसार विभागांमध्ये फी विभाजित करणे यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण आव्हाने आम्हाला प्रदान केलेल्या सोल्‍यूशनमुळे सहजपणे सोडवली जातात. ईजबझने आमच्या गरजांवर आधारित एक उत्पादन देखील तयार केले, ज्याने आम्हाला डिजिटली सक्षम युनिव्हर्सिटी बनण्यास मदत केली आहे.”

ईजबझच्या व्‍यवसायाचे ग्रुप हेड रोहित कट्याल म्हणाले, “आम्ही नेहमीच समस्येचे मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एकदा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर फी भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक नोड्स असतात, जे अत्‍यंत जटिल असतात. आमच्या टीमने एक सर्वसमावेशक उत्पादन डिझाइन केले आहे, जे फी संकलन स्वयंचलित करणे, त्यावर देखरेख ठेवणे, त्यासंदर्भातील आव्हानांचे निराकरण करणे अशा सुविधा देण्यासोबत स्मार्ट फॉर्म्सचा वापर करत विद्यार्थ्यांसाठी प्रबळ डेटाबेस, कोर्सची निर्मिती देखील करू शकते.”


Back to top button
Don`t copy text!