दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिशाहिन नेतत्वामुळेच शिवसेना दुभंगली. ठाकरे गटाचे अस्तित्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट दिसून येते. आता वाचाळवीर नेत्यांमुळे उरलासुरला ठाकरे गटतही दुभंगण्याची शक्यता आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
संजय राऊत यांनी शिवसेना संपवायची ‘सुपारी’ घेतली आहे.ते रोज काहीना काही बरळत असतात. राऊत यांनी जनतेची कामे करावीत,त्यांची प्रश्न सोडवावीत.केवळ टिव्ही समोर ते बोलतांना दिसतात.संघटनात्मक दौरे करतांना दिसून येत नाहीत.उद्धव ठाकरे हे आता भ्रमित झाले आहेत.त्यांनी राऊत यांना मोकळे सोडले आहे.त्यामुळे शिवसेनेतील लोक बाहेर पडत आहेत.उरलासुरला ठाकरे गटातील नेते पर्याय शोधत आहेत.एकनाथ शिंदे यांनी पुर्ण शिवसेना फोडली आहे.
अशात १०% मत मिळवणे देखील ठाकरे गटाला दिव्य स्वप्नासारखे आहे.सुषमा अंधारे, विनायक राऊत,भास्कर जाधव, संजय राऊत हे सर्व ठाकरे गटाचे नेते टिव्ही बोलत असतात.ग्रामपंचायतीच्या निकालावरुन शिवसेना संपत चालली आहे,हे लक्षात येते. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घेतल्याने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या.पंरतु, आता पुढील वर्षी होवू घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा टिकाव लागणार नाही.लोकसभेत ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही.तर, विधानसभेत केवळ ५ ते १० जागांवर उद्धव ठाकरे यांना समाधान मानावे लागेल, असा दावा हेमंत पाटील यांनी केला आहे.