दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । मुंबई । हेल्थटेक क्षेत्रात कार्यरत असलेली तसेच आरोग्यसेवांचा पुरवठा करणारी कंपनी इव्हेन आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद क्षेत्रातील भारताची अग्रगण्य कंपनी स्टॅनप्लस यांनी आपत्कालीन वैद्यकीय वाहतुक सेवा पुरविण्यासाठी केलेल्या भागीदारीची आज घोषणा केली. रुग्णांना भारतभरात कुठेही रस्ते व हवाई रुग्णवाहिका तसेच ‘डॉक्टर ऑन कॉल’ सेवेसह आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सदासर्वदा आणि कोणत्याही अमर्याद प्रमाणात उपलब्ध व्हावी याची हमी देण्यासाठी स्टॅनप्लस आणि इव्हेन या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या निकट संपर्कात राहून काम करणार आहेत.
रुग्णांना कोणत्याही दगदगीशिवाय या सेवेचा अनुभव मिळावा यासाठी आपत्कालीन प्रतिसाद म्हणून १८००-१२१-३८८२ हा खास आपत्कालीन नंबर खास २४/७ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सेवेसाठी केलेला फोन कॉल सेंटरमध्ये घेतला जाईल आणि ओटीपी पाठवून ऑनलाइन व्हेरिफिकेशन केले जाईल. हा क्रमांक मिळविण्यासाठी कंपनीचा असोसिएट फोन करणा-या व्यक्तीला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक इव्हेनला पुरविण्याची विनंती करेल. या ओटीपीची ओळख पटली की असोसिएटद्वारे ओपीडी यूआरएलचा वापर करून ओटीपीची पडताळणी केली जाईल.
स्टॅनप्लसचे सह-संस्थापक आणि सीईओ प्रभदीप सिंग म्हणाले, “स्टॅनप्लसमध्ये आम्हाला ‘फर्स्ट मिनिट, लास्ट माइल’ या संकल्पनेवर आधारित आरोग्य सेवासंच तयार करायचा आहे, ज्यात ८-मिनिट रुग्णवाहिनी सेवा उपलब्ध असेल. भारतातील अग्रगण्य हॉस्पिटल चेन्सबरोबर थेट टाय-अप असलेल्या इव्हेन बरोबर केलेल्या भागीदारीमुळे आम्हाला आपल्या आपत्कालीन वैद्यकीय वाहतुक सेवा अधिक मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचविण्याचे आमचे लक्ष्य साध्य करण्यास मदत होणार आहे. अधिक आरोग्यपूर्ण भारत साकारण्याचे आमचे सामायिक लक्ष्य गाठण्यासाठी इव्हेनच्या साथीने काम करत असल्याचा आम्हाला आनंद आहे.“
इव्हेन ही एक नोंदणीवर आधारित आरोग्यसेवा पुरवठादार कंपनी आहे व आपल्या सदस्यांना उच्च दर्जाची आणि सहज उपलब्ध होऊ शकणारी प्राथमिक आरोग्यसेवा देऊ करण्यावर तिने आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीच्या अमर्याद ओपीडी सेवा (डॉक्टरांचा सल्ला तसेच निदान) हे कंपनीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामुळे सदस्यांना प्रतिबंधात्मक देखभाल अधिक सहजरित्या उपलब्ध होणार आहे. स्टॅनप्लसबरोबरची भागीदारी हा आपल्या सदस्यांसाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवठादार बनण्याच्या इव्हेनच्या धोरणात्मक योजनेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.