पक्षकारांनी सामंजस्याने व सुसंवादाने जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत – प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ फेब्रुवारी २०२३ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ जिल्हा सातारा यांच्यावतीनेही राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी सामंजस्याने व सुसंवादाने तडजोड करुन जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश . एस. जाधव यांनी केले.

येथील जिल्हा न्यायालयात   राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव बी.एम.माने, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील, पक्षकार उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघावीत यासाठी पक्षकारांचे मनपरिर्वतन करावे. वाद हा सुसंवादातूनच मिटला जातो.  पक्षकारांनी सुसंवादातून जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही लोकअदालतीला चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयात दाखल असलेली विविध प्रकरणे सामंजस्याने मिटावीत म्हणून २९ पॅनल व ऑनलाईन एक पॅनल कामकाजाकरिता आहे.  जिल्ह्यात प्रलंबित सुमारे ९ हजार ७९६ प्रकरणे तर वादपूर्व ३ हजार ४९० प्रकरणे चर्चेसाठी ठेवली असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव बी.एम. माने यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!