दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, कृषी महाविद्यालय फलटण अंतर्गत, ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी ग्राम स्वच्छतेत सहभाग घेतला. यावेळी गावातील ग्रामपंचायत परिसर, रस्ते तसेच शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच सौ. जयश्रीताई भोसले, उपसरपंच श्री. काकासो कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, साक्षी शिंदे, समृद्धी उल्हारे, हर्षदा लोखंडे, शिवांजली धुमाळ व समृद्धी कुंजीर यांच्याद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात आला.