दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी ग्रामपंचायत मठाचीवाडी येथे बुधराणी हॉस्पिटल, पुणे व मठाचीवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांमध्ये सहभाग घेतला.
हे शिबिर दि.२७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेमध्ये पार पडले. या शिबिरामध्ये केस पेपर फी व नाव नोंदणी फी वीस रूपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, कॉम्प्युटर मशीनद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी करून गरजूंना अल्प दरामध्ये चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिराचा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, साक्षी शिंदे, समृद्धी उल्हारे, हर्षदा लोखंडे, शिवांजली धुमाळ व समृद्धी कुंजीर यांच्याद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात आला.