पंतप्रधान पीक विमा योजनेत फलटण तालुक्यातील २४ हजार ६३२ शेतकर्‍यांचा सहभाग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
खरीप हंगाम २०२३ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (सर्वसमावेशक पीक विमा योजना) फलटण तालुक्यामधून बाजरी व कांदा पिकाचा विमा काढलेल्या शेतकर्‍यांची संख्या २४ हजार ६३२ आहे. या शेतकर्‍यांचे एकूण विमा संरक्षित क्षेत्र ११ हजार ४१८ हेक्टर असून शेतकरी हिस्सा रक्कम रूपये २४ हजार ६३२ आहे. यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा १.९० कोटी रूपये असून केंद्र शासनाचा हिस्सा ९२.४२ लाख रूपये आहे, अशी माहिती फलटणचे तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी दिली.

या पिक विमा योजनेत एकूण सहभागी शेतकर्‍यांपैकी पुरूष शेतकर्‍यांची संख्या २० हजार ४४८ आहे, तर महिला शेतकरी ४ हजार १७९ असून इतर वर्गातील ५ शेतकरी आहेत.

पिक विम्यातील शेतकर्‍यांची प्रवर्ग निहाय विभागणी अशी :

SC= 1130
ST= 253
OBC = 10406
GEN = 12843


Back to top button
Don`t copy text!