
स्थैर्य, 16 फेब्रुवारी, सातारा : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ऐतिहासिक शहिदीला 350 वर्ष पूर्ण होत असून या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून खारघर, नवी मुंबई (रायगड) या ठिकाणी दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च या दिवशी ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 मार्च रोजी होणार्या कार्यक्रमास जिल्ह्यातील समाज बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले आहे.
अपर जिल्हाधिकारी श्री. माने यांच्या दालनात श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय संघटक सचिन वालेकर यांच्यासह विविध समाजांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी मोहयाल, वाल्मिकी, उदासीन भगत नामदेव (वारकरी) या समाजातील नागरिकांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या समाजातील नागरिकांची कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जाणार्या नागरिकांची अचूक माहिती महसूल प्रशासनाला द्यावी, असेही अपर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी बैठकीत सांगितले.
तसेच जे नागरीक खासगी वाहनातून जाणार आहेत त्यांचा वाहन क्रमांक द्यावा. टोल माफीसाठी पत्र देण्यात येईल. तसेच जाणार्या नागरिकांना ओळखपत्रही देण्यात येईल. तसेच कार्यक्रमाला जाण्यासंदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच श्री. वालेकर यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 9850988941 यांच्याशीही संपर्क साधावा, असेही आवाहनही अपर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी केले आहे.

