
स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : ‘हर घर तिरंगा २०२५’ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिकांनी दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरांवर आणि आस्थापनांवर सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज फडकवून या अभियानात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन फलटण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत दि. १२ ऑगस्ट रोजी शहरात आयोजित तिरंगा रॅलीस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केली आहे.