स्थैर्य, फलटण, दि. २१ : दिनांक १८ मे रोजी कुर्ला, मुंबई येथून कुटुंबासह अक्षतनगर, कोळकी येथे आलेल्या ७४ वर्षीय व्यक्तीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. मुंबईवरून आलेला असल्याने मृत्यूनंतरही सस्पेक्ट म्हणून त्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला व त्या व्यक्तीचा रिपोर्ट काल रात्री उशिरा पाॅसिटीव्ह आला असल्याचे कळल्यानंतर अक्षतनगर, कोळकीचा भाग मायक्रो कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
या वेळी अधिक माहिती देताना डॉ. जगताप म्हणाले कि, सदर व्यक्तींचे १२ हाय रिस्क व ३ लो रिस्क संपर्क व्यक्तींची माहिती घेण्यात आली आहे. हाय रिस्क व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले आहे. कोळकी ग्रामपंचायत हद्दीमधील अक्षतनगरचा ब्रम्हा हाॅटेल ते आरोग्य उपकेंद्रपर्यंतचा भाग हा मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.