संसद अधिवेशन : नेहरू – गांधी कुटुंबावरील टिप्पणीमुळे प्रचंड गदारोळ, कामकाज चार वेळा स्थगित; ठाकूर यांनी मागितली माफी


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९: संसद अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी लोकसभेत अर्थमंत्र्यांनी एक विधेयक मांडल्यानंतर एकच गदारोळ झाला. चर्चेदरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी पीएम केअर्स फंडाच्या स्थापनेबाबत काही प्रश्न उपस्थित केले. काही सदस्यांनी हा निधी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीत वर्ग करावा, अशी सूचना केली.

वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला. ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. सभागृहात गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज चार वेळा स्थगित करावे लागले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अनुराग ठाकूर यांनी माफी मागितल्यानंतर कामकाज पुढे सुरू झाले.

असा वाढला वाद :

विधेयक सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, हे विधेयक मार्चमध्ये आणण्यात आलेल्या अध्यादेशाची जागा घेईल. केंद्र राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहे हा विरोधी पक्षांचा आरोप चुकीचा आहे. राज्यांना जीएसटीचा हिस्सा देणार नाही, असे आम्ही कधीही म्हणालो नाही. आता पीएम केअर फंडाची विस्तृत माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर देतील.

त्यानंतर अनुराग ठाकूर उभे राहताच विरोधकांनी पीएम केअर फंडावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर ठाकूर म्हणाले की, काँग्रेसने पीएम मदत निधीचा गैरवापर केला. ज्यांना याचा लाभ मिळाला त्यांची नावे मी सांगू शकतो. १९४८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी शाही हुकमाप्रमाणे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी तयार करण्याचा आदेश दिला होता. या निधीची नोंदणी आजपर्यंत करण्यात आलेली नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!