
दैनिक स्थैर्य । 4 जून 2025। फलटण । येथील फलटण एज्यूकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामिण कृषि कार्यानुभव 2025-26 संदर्भात पालक सभा उत्साहात पार पडली.
समन्वयक प्रा. एन. एस. ढाल्पे यांनी पालक सभेचे उद्देश, ग्रामिण कृषि कार्यानुभाचे महत्व, या कार्यक्रमातील महत्वाचे उपक्रम ग्रामिण भाग सहभाग, कृषि सबंधित शैक्षणिक, संशोधन, विस्तार अभ्यास, पिक चिकित्सालय अभ्यास, कृषि संबंधित औद्योगिक अभ्यास याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. एस. एम. साळुंखे व प्रा. एन. ए. पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. एस. एम. साळुंखे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभाचे महत्व सांगितले. सौ. दीपाली लडकत, भागवत चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाज सबंधित माहिती सांगितली.
प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे अनुभव, कार्यक्रम राबविताना विद्यार्थ्यांची जबाबदारी व शिस्त, महाविद्यालयाची व पालकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. पालक सभेसाठी प्रा. एस. एस. आडत, प्रा. स्वप्नील लाळगे, प्रा. जी. एस. शिंदे उपस्थित होते.
पालकांनी प्राद्यापकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शंका दूर केल्या. तसेच यानंतर महाविद्यालयातील विविध शैक्षणिक आणि सह-शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. पालकांनी या सभेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार मानले. प्रा. एन. ए. पंडित यांनी आभार मानले.