दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
आपल्या जीवनातील खरे मार्गदर्शक आपले आई-वडीलच असतात, असे प्रतिपादन चांडाळ चौकडी फिल्म प्रोडक्शनचे दिग्दर्शक /मुख्य कलाकार रामदास जगताप उर्फ रामभाऊ यांनी केले.
भाडळी बु. (ता. फलटण) येथे मातोश्री वि.का.स.सेवा सोसायटी, जाणता राजा प्रतिष्ठान व मातोश्री संस्था समूह आयोजित ‘दिपावली पाडवा’निमित्त स्नेह मेळावा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
रामभाऊ पुढे म्हणाले की, अशा प्रकारचा कार्यक्रम हा गावातील तरुणांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची प्रेरणा देणारा आहे. त्यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.
स्नेह मेळाव्यास श्री. सचिन रणवरे (मा.पं.स.सदस्य फलटण), श्री. हनुमंतराव सोनवलकर (उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटना), अॅड. सचिन सोनवलकर, श्री. नानासाहेब काळुखे (उपसरपंच तिरकवाडी), श्री. सागर डांगे (तालुका कृषी अधिकारी), श्री. राजेश डांगे (शाखा व्यवस्थापक एसबीआय), पत्रकार श्री. शितल लंगडे, श्री. सुभाष सोनवलकर, श्री. मनोज पवार, ज्येष्ठ नागरिक श्री. संपत डांगे, श्री. महादेव माने, श्री. संजय डांगे, श्री. दत्ता सावंत, प्रा. विजयकुमार डांगे, श्री. चंद्रकांत डांगे, माजी सैनिक श्री. संतोष डांगे, श्री. अजित डांगे, श्री. भालचंद्र डांगे, श्री. जयपाल डांगे, श्री. माधव डांगे, श्री. आदिनाथ मुळीक, श्री. अरुण डांगे, श्री. अजित बाबासाहेब डांगे, श्री. ऋषी भोईटे, श्री. राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री. मंगेश माने, श्री. अभिजीत माने, श्री. सुरज डांगे, श्री. कैलास डांगे, श्री. संग्रामसिंह माने, श्री. सुरज गोरे, श्री. धर्मेंद्र शिरतोडे यांच्यासह ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होते.
यावेळी गावातील तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पदोन्नती मिळाल्याबद्दल सर्व यशस्वीतांचा सन्मान करण्यात आला.त्यामध्ये श्री. रमेश डांगे, चि. प्रदिप डांगे, चि. प्रथमेश डांगे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ह.भ.प. स्वप्निल शेंडे महाराज यांनी केले. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून यापुढे दरवर्षी दिपावलीनिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याचा मनोदय मातोश्री संस्था समूहाचे संस्थापक चेअरमन श्री. मोहनराव डांगे यांनी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. पवन डांगे यांनी आभार मानले.