परभणी : निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशीसह दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, परभणी, दि.८: गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामासाठीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ४ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह एक अभियंता व एक अव्वल कारकूनास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी (ता. ८) ताब्यात घेतले.

गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामाच्या प्रशाकीय मान्यतेसाठी गंगाखेड नगर पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागाकडे या बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळविण्यासाठी नगर पालिकेतील एक नगरसेवक निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करीत होता. मात्र या प्रस्तावाच्या एकूण रक्कमेच्या दीड टक्के प्रमाणे चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी सूर्यवंशी यांनी अन्य दोघा कर्मचाऱ्यांच्या मार्फत केली होती, अशी तक्रार संबंधीत नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केल्यानंतर सोमवारी (दि.7) विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात जावून पडताळणी केली. त्या पडताळणीत नगर प्रशासन विभागातील अव्वल कारकून श्रीकांत विलासराव करभाजने व गंगाखेड पालिकेचे स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयुम यांनी प्रशाकीय मान्यतेसाठीच्या ४ लाख ५० हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केल्याचे व ही मागणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत अव्वल कारकून करभाजने व अभियंता अब्दुल खयुम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून साडेचार लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. त्याचवेळी पथकाने या दोघांसह सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पथकाचे उपाधिक्षक भरत हुंबे, निरीक्षक अमोल कडू, जमीलोद्दीन जहागिरदार, शेख शकील, अनिल कटारे, माणिक चट्टे, अनिरुध्द कुलकर्णी, सचिन धबडगे आदींनी ही कारवाई केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!