
स्थैर्य, पुणे, दि. २: ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेत अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.पांडुरंग रायकर यांचा जीव गेला, हे निश्चित दु:खदायक आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसं सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीये.कोरोना काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल. ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. विम्याची मदत मिळवून द्यायचा त्यांना प्रयत्न करु, असं आश्वासन राजेश टोपे यांनी दिलं आहे.
दरम्यान, बेड कमी पडत असतील तरी ते वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.