राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेंबर २०२२ । नवी दिल्ली । भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळीसहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पं. नेहरू यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Back to top button
Don`t copy text!