पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 27 फेब्रुवारी रोजी आयोजन


स्थैर्य, 21 फेब्रुवारी, सातारा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने सातारा जिल्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 27 फेब्रुवारी रोजी डी.पी. भोसले महाविद्यालय, सुभाषनगर कोरेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.

या मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल/अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 1200 पेक्षा जास्त रिक्तपदे Chef, Dresser, Steward, Washerman, Mess Keeper & House Keeper). या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 27 जुलै रोजी डी.पी. भोसले महाविद्यालय, सुभाषनगर कोरेगाव येथे आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे, मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, सातारा श्री. सुनिल पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!