
दैनिक स्थैर्य । 18 मार्च 2025। सातारा । सातारा जिल्हायातील बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार दि. 21 मार्च रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व सुभानमंगल प्रतिष्ठान शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात 10 वी,12 वी पदवीधर,आयटीआय,सर्व ट्रेड,डिप्लोमा,इंजिनिअर, कुशल/अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 900 पेक्षा जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसुचित केलेली आहेत.
तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 21 मार्च 2025 रोजी श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ,ता. खडांळा येथे आपली शैक्षणीक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे.मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रंमाक 02162-239938 या क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.