पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीवर महाबोधिवृक्षाचा वारसा सांगणाऱ्या बोधिवृक्षाचे पूजन


दैनिक स्थैर्य | दि. 04 जून 2023 | पंढरपूर | ज्येष्ठ पौर्णिमा (भिक्खुणी संघमित्रा यांनी महाबोधीवृक्षाच्या फांदीचे श्रीलंकेत रोपण केले तो दिवस) या दिवसाचे औचित्य साधत रविवार दि. ०४ जून २०२३ रोजी सकाळी ०७:५६ वाजता पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीवर महाबोधिवृक्षाचा वारसा सांगणाऱ्या बोधिवृक्षाचे पूजन सम्यक क्रांती मंचने आयोजित केले.

याप्रसंगी बौद्धाचार्य विलास जगधने सर, धम्मामित्र प्रभाकर सरवदे आणि सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत लोंढे, सचिव स्वप्नील गायकवाड यांच्या उपस्थितीत त्रिपिटक ग्रंथ पूजा आणि अठ्ठावीस परित्त पाठ पठण आणि धम्मध्वज वंदना घेण्यात आली.

याप्रसंगी शुक्रवार दिनांक ०२/०६/२०२३ रोजी ओडिशातील बलासोर जिल्ह्यातील बहनगा स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!