पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी एक जागतिक पर्यटनस्थळ ठरेल : आमदार समाधान आवताडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । मुंबई । सम्यक क्रांती मंच आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह समिती यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतभर साजरा होणाऱ्या ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमिवर आयोजित करण्यात आलेल्या धम्मध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन पंढरी नगरीचे सांस्कृतिक तथा अध्यात्मिक वैभव संपन्न करणारा धम्मध्वज पंढरपूर नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष लक्ष्मण (भाऊ) शिरसट यांच्या हस्ते भूमी, आकाश, समुद्र व्यापत ध्वज स्तंभावर वेगाने आरूढ करण्यात आला आणि तो पंढरपूर नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष तथा रि. पा. इं. चे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. सुनील सर्वगोड यांच्या हस्ते आसमंतात फडकविण्यात आला. या प्रसंगी धम्म ध्वजाला  वंदन करताना महात्मा फुले कला महाविद्यालयाचे  संस्थापक भारत माळी, पंढरपूर तालुक्यातील पँथर चळवळीचे संस्थापक सदस्य शशी बाबर, धम्म उपासिका सौ. विणा बाबर, सौ. भाग्यश्री सचिन बाबर, कुमारी सुप्रिया बाबर, मा. नगरसेवक संजय निंबाळकर, विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे माजी संचालक हुंगे पाटील, मा. नगरसेवक अंबादास धोत्रे, पत्रकार रामभाऊ सरवदे, पत्रकार प्रमोद सुडके, युवानेते विकास गायकवाड, काशिकापडी समाजाचे कार्यकर्ते सनी पिंगळे, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. जनार्दन महाराज पोफळे, ओबीसी नेते अण्णा जाधव, खर्डी गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य,  अरविंद कांबळे, कृष्णाजी लिहिणे, मिटकॉनचे समन्वयक अरविंद दोरवट, कॉन्ट्रॅक्टर प्रकाश वाळके, विनोद धुमाळ, यशवंत सोंडकर, गौतम शेवडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र आवारे, तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह समितीचे अध्यक्ष जे. के. गायकवाड, सचिव संजय सावंत, सम्यक क्रांती मंच चे अध्यक्ष मा. प्रशांत लोंढे, सचिव स्वप्नील गायकवाड, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रविंद्र शेवडे, कार्यकारिणी सदस्य दीपक वाघमारे, सुहास जाधव, वैभव माने, राजन गायकवाड, निलेश सोनवणे, शरद भंडारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मा. आमदार समाधान दादा आवताडे या धम्मध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले त्यांनी पंढरी नगरीचे सांस्कृतिक तथा अध्यात्मिक वैभव संपन्न करणाऱ्या या धम्मध्वजास वंदन केले याप्रसंगी बोलताना बौद्ध धम्माचे समतेचे तत्वज्ञान प्रसारित करणारा हा धम्मध्वज भूमी, आकाश, समुद्र व्यापून आसमंतात दृढ झाला आहे. हा धम्मध्वज आसमंतात चिरंतन फडकत राहील. अशा शुभेच्छा देत या बुद्धभूमिचा जागतिक पर्यटनाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी  मी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे  सांगितले.

Back to top button
Don`t copy text!