पंढरपूर ‘एमआयडिसी’ विरोधक ‘सरंजामशाही’ प्रवृत्तीचे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । पंढरपूर । पंढरपूरात एम.आय.डि.सी असावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी स्थानिक आमदारांच्या प्रयत्नातून यशस्वी होत असताना, काही मुठभर सरंजामशाही प्रवृत्तीचे लोक विरोध करीत आहेत. स्थानिक लोकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवनवीन संध्या एमआयडिसीच्या माध्यमातून निर्माण होणार आहेत. लघु उद्योगांना अत्यल्प दरात वीज,पाणी,रस्ते,गाळे विविध करांमधून सवलती, व्यवसायास पुरक दळणवळणाची साधने उपलब्ध होतील. पंढरपुरातील स्थानिकांना रोजगार, व्यवसाय करण्यासाठी संधी मिळेल. परंतू काही सरंजामशाही प्रवृत्ती लोक एमआयडिसीचा विरोध करीत आहेत. संबंधित लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही वृत्ती अजून ही गेलेली दिसून येत नाही. बारा हजार बागायत क्षेत्रात बारा हजार शेत मजूर काम करतात, असे छाती ठोकून सांगत आहे. बारा हजार शेत मजूरांनी पिढ्यांनीपिढ्या शेत मजूरीच करुन गुलामगिरीचे जीवन व्यथित करावे, अशाच मानसिक प्रवृत्तीतून पंढरपूर एमआयडिसीस विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक बेरोजगार व शेत मजूरांना अर्थिक विषमतेच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी एमआयडिसी अत्यंत गरजेची आहे. असे प्रतीपादन बसपाचे जिल्हा महासचिव रवी सर्वगोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.


Back to top button
Don`t copy text!