दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | पंढरपूर | पंढरपूर आषाढीवारी यात्रा कालावधीत पंढरपूर शहर व गावात सार्वजनिक ठिकाणी घाण करु नये. असा इसम कायदेशीर कारवाईस पात्र होईल. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ अन्वये अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबत नोटीस जारी केली आहे.
नोटिशीत म्हटले आहे, पंढरपूर आषाढीवारी यात्रा दि.२०.०६.२०२३ ते दि.०४.०७.२०२३ या कालावधीत भरणार आहे. सदर मुदतीत पंढरपूर शहर व गावात, रेल्वे स्टेशनवर, सार्वत्रिक ठिकाणी लघवीस, शौचास बसण्याकरिता शासनाने उपलब्ध करुन दिलेले कायमस्वरुपी अयवा तात्पुरते शौचालय मृताऱ्या व ते सहज दिसावेत म्हणून त्यावर तांबडी निशाने लावली जाणार आहेत. तरी यात्रेकरूंनी त्याशिवाय इतर ठिकाणी घाण करु नये. या व्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास सदरहू इसम कायदेशीर कारवाईस पात्र होईल.