दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२३ । पंढरपूर । महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याण मंडळ व हिंद लॅब्स मार्फत राज्यात जिल्हा निहाय नोंदीत कामगार व कुटुंबा करिता आरोग्य तपासणी आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये ५० हून अधिक महत्त्वपूर्ण आरोग्य तपासण्या पूर्णत: मोफत केल्या जातात. तसेच शारीरिक तपासणी: संपूर्ण आरोग्याचे मूल्यांकन करते आणि शारीरिक विकृती शोधते. फुफ्फुसाचे कार्य चाचणी: फुफ्फुसाची क्षमता मोजते आणि श्वसन कार्याचे मूल्यांकन करते. ऑडिओ स्क्रीनिंग चाचणी: ऐकण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करते आणि श्रवण दोष शोधते. व्हिजन स्क्रीनिंग टेस्ट: व्हिज्युअल तीक्ष्णतेचे मूल्यांकन करते आणि दृष्टी समस्या शोधते. रक्त आणि मूत्र चाचणी: आरोग्याच्या विविध पैलूंचे मूल्यांकनासाठी आणि विकृती शोधण्यासाठी रक्त आणि मूत्र नमुन्यांची विश्लेषण करते. संपूर्ण रक्त गणना: रक्त पेशी पातळीचे मूल्यांकन, रक्तातील साखर : रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे मूल्यांकन करणे. यकृत कार्य चाचणी: यकृत एंजाइम पातळीचे मूल्यांकन, रेनल फंक्शन टेस्ट: किडनी फंक्शन पॅरामीटर्सचे मूल्यांकन करणे, लिपिड प्रोफाइल: कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळीचे मूल्यांकन, मलेरिया परजीवी: मलेरियाची उपस्थिती शोधणे,एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट: जळजळ पातळी मोजणे, T3, T4, TSH: थायरॉईड संप्रेरक पातळीचे मूल्यांकन, लोह: शरीरातील लोह पातळीचे मूल्यांकन करणे, GGTP: यकृत कार्याचे मूल्यांकन करणे, मॅग्नेशियम: शरीरातील मॅग्नेशियम पातळीचे मूल्यांकन, मूत्र नियमित चाचणी: मूत्राच्या विविध पैलूंचे विश्लेषण इत्यादीचे तपासणी करण्यात येतात. बदलती जीवनशैली ही आरोग्याच्या विविध समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. सर्वसामान्य वयोगटात आढळणाऱ्या आजारांमध्ये मधुमेह,लठ्ठपणा,फुफ्फुसाचे रोग,उच्च रक्तदाब,हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा दीर्घकालीन धोका,चयापचय विकार आणि यकृत रोग यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळातच या आरोग्यविषयक समस्या गांभीर्याने घेत त्यानुसार उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुंत रोखता येऊ शकते तसेच नियमित आरोग्य तपासणीद्वारे तीव्र आजारांचे वेळीच निदान करणे शक्य होते. पंढरपूरात सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून येथील कार्यालयात दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्य तपासणीचा प्रारंभ हिंद लॅब्स चे मॅनेजर शशिकांत डोंगरे, रवी सर्वगोड,प्रदीप परकाळे,अल्ताफ शेख,कॅम्प मॅनेजर सतिश शिंदे, किशोर कदम,निलेश मोरे, युवराज माने, प्रथमेश सर्वगोड इत्यादींच्या उपस्थितीत झाले.