पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत ७ ऑक्टोबरला; फलटणच्या जागेकडे तालुक्याचे लक्ष

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता होणार सोडत; उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची माहिती


स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. या घोषणेमुळे फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी नक्की कोणते आरक्षण पडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी ही माहिती दिली असून, सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या सोडत कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार, सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठीचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती (महिला) – १, नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) – २, नागरिकाचा मागास प्रवर्ग (खुला) – १, सर्वसाधारण (महिला) – ३, आणि सर्वसाधारण (खुला) – ४, अशा एकूण ११ पदांसाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!