
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । सातारा । पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ’सुपर स्वच्छ लीग’मध्ये बाजी मारली आहे. या पुरस्कार वितरण आज (गुरुवारी) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे.
पाचगणी नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण – 2024 मध्ये शहर स्वच्छतेत सातत्य व नावीन्यपूर्ण बाबींचा समावेश करत केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच अव्वल कामगिरी केली आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणार्या शहरांसाठी केंद्र सरकारने यावर्षीपासून ’सुपर स्वच्छ लीग’चे आयोजन केले होते.
यात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणार्या शहरांसाठी स्वच्छतेच्या बाबतीत अजून काही महत्त्वाचे नियम व अटी यांचा समावेश करत स्पर्धा जास्तकठीण केली होती. स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये सुपर स्वच्छ लीग ही एक नवी आणि महत्त्वपूर्ण श्रेणी समाविष्ट करण्यात आली होती.
मागील तीन वर्षांत स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणार्या निवडक शहरांसाठी ही श्रेणी सुरू करण्यात आली. 20 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटातील देशभरातील शहरांमध्ये पाचगणीने वर्चस्व सिद्ध केले आहे.
सुपर स्वच्छ लीगमध्ये आपले स्थानटिकवण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 85 टक्के गुण मिळवणे आवश्यक होते. पाचगणी शहराने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपले अग्रस्थान प्राप्त केले.
सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयास आणि पर्यटनस्थळ स्वच्छ व नीटनेटके ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाचगणी गिरिस्थानसध्या पाचगणीनगरपालिकेला प्रशासक आहे. या काळातही पालिकेचे प्रशासक कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून स्वच्छतेत सातत्य ठेवत आपला डंका कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
यामध्ये प्रशासन व कर्मचार्यांचे योगदान आहे.नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सुद्धा बाजी मारली आहे.