
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण । प्रोग्रासिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोळकी च्या वतीने फलटण शहरामध्ये आषाढी एकादशी पालखी सोहळा व वृक्ष दिंडीचे आयोजन उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात करण्यात आले. चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी ,महाराष्ट्रतील विविध संत,वारकरी यांची पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. तसेच टाळ, चिपळ्या, मृदंग ,वीणा व भगव्या पताका घेऊन विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी निघाली. दिंडीचा मार्ग प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज प्रांगण ते संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर, डेक्कन चौक या ठिकाणापर्यंत होता.आषाढी एकादशी दिंडी सोहळा व वृक्षदिंडी कार्यक्रम हा संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड , प्राचार्य श्री.संदीप किसवे, समन्वयिका सौ. माधुरी काटकर, सौ सुवर्णा निकम, सौ.योगिता सस्ते, पर्यवेक्षक श्री. अमित सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. इयत्ता ४थी ५ वी, ६ वी च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई… विठोबा रखुमाई या गीतावरती अतिशय सुंदर नृत्य सादरीकरण केले. यासाठी नृत्यदिग्दर्शक प्रशांत भोसले यांनी मार्गदर्शन केले.तसेच इयत्ता ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित पथनाट्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा असा वृक्षलागवडीचा महत्त्वपुर्ण संदेश दिला.त्याच बरोबर इ.१ली ते इ.५ वी चे विद्यार्थी विठ्ठलाच्या वेशभूषेत,तर विद्यार्थिनी रुक्मिणीच्या वेशभुषेत उपस्थित होते.वल्लभ जाधव या विद्यार्थ्याने अभंग,वरद कर्वे व राज कर्वे या विद्यार्थ्यांनी किर्तन,तर चैतन्य तोरसकर,गुरुराज यादव व सार्थक सोनवलकर यांनी भारूड सादर करून फलटणकरांचे विशेष लक्ष वेधले व या प्रोग्रेसिव्हच्या सोहळयाचे व बालवारक-यांचे मार्गावरील लोकांनी विशेष कौतुक केले. या सोहळ्यामध्ये पालकांनीही उस्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित सर्व मान्यवरांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे आधारस्तंभ श्री. पांडुरंग पवार(भाऊ) यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्री.सुभेदार डुबल सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्याचबरोबर लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्ष सौ.सुनंदा भोसले, सेक्रेटरी सौ.सुनिता कदम, खजिनदार, सौ.सुजाता सोनवलकर उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सकाळ च्या वतीने आयडाॅल ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.त्यांनी हे यश आपल्या सर्वांमुळे मिळाले आहे, असे मत व्यक्त केले.याप्रसंगी शालेय परिसरात मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.संदीप किसवे यांनी व सूत्रसंचालन सौ.रोहिणी ठोंबरे व सौ.सोनाली कोकरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.