श्री. सदगुरु शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चा गजर करीत पालखी सोहळा साजरा


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । कोळकी ।  श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे निमित्ताने फलटण येथील श्री .सदगुरु शिक्षण संस्थेच्या  चिमुकल्यानी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चा गजर करीत परिसरात दिंडी काढली.
या प्रसंगी या बालगोपाळानी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती.चिमुकल्या वारकऱ्यांना विसाव्याच्या ठिकाणी खाऊवाटप करण्यात आले. टाळ्यांचा गजरात माऊली माऊली चा गजर करीत परिसर माऊलीमय केला.येथील गणपती  मंदिरात मुलांनी ,मुलींनी फुगडी घातली, फेर धरला.
या दिंडीत  जिजामाता बालक मंदिर, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर ,सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल चे विद्यार्थी  तसेच सर्व शिक्षिका,  सामील झाले होते.

Back to top button
Don`t copy text!