कुलभूषण जाधव यांचा शिक्षेबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार: पाकिस्तान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ०९ : पाकिस्तानच्या जेलमध्ये अटकेत असलेले कुलभूषण जाधव यांनी आपल्या शिक्षेबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अतिरिक्त अटर्नी जनरल अहमद इरफान यांनी दिली आहे.

पण कुलभूषण जाधव आपल्या मर्सी पीटिशनबाबत युक्तिवाद सुरू ठेवणार असल्याचं अटर्नी जनरल अहमद यांनी कळवलं. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. 17 जुलै 2019 ला आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) जाधव प्रकरणी सुनावणी झाली होती. यामध्ये पाकिस्तानने जाधव यांना दिलेल्या मृत्यूच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करावा आणि त्यांना वकिलाचा सल्ला घेण्याची परवानगी द्यावी, असा निर्णय आयसीजेने दिला होता.

पाकिस्तानने जाधव यांना काऊंसिलर अॅक्सेस न देऊन व्हिएन्ना कन्वेशनचा भंग केला आहे, असंही आयसीजेने म्हटलं होतं.

बुधवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलताना इरफान म्हणाले, “पाकिस्तानने कमांडर जाधव यांची आपल्या वडिलांशी भेट घडवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारत सरकारला याची माहिती देण्यात आली आहे. कमांडर जाधव यांना दुसऱ्यांदा काऊंलर अक्सेस मिळण्याबाबत भारताच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.”

अहमद इरफान पुढे म्हणाले, “पाकिस्तानने यापूर्वीसुद्धा कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास तयार आहे.”

कुलभूषण जाधव प्रकरणात रिव्ह्यू पीटिशन दाखल करावं, असं पाकिस्तानने अनेकवेळा भारतीय उच्यायुक्त कार्यालयाला सांगितल्याचं अटर्नी जनरल म्हणाले.

पाकिस्तानच्या कायद्यातच रिव्ह्यू पीटिशन दाखल करण्याची तरतूद आहे. पण तरीसुद्धा पाकिस्तानने 28 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं रिव्ह्यू अँड रिकन्सिडरेशन 2020 लागू केलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

या अध्यादेशाअंतर्गत 60 दिवसांच्या आता एक पुनर्विचार याचिका इस्लामाबाद हायकोर्टात दाखल करता येऊ शकते.

ही याचिका स्वतः कुलभूषण जाधव, पाकिस्तानातील त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी किंवा भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडून दाखल केलं जाऊ शकतं.

अहमद इरफान यांच्यानुसार, 17 जूनला कुलभषण जाधव यांना बोलावून रिव्ह्यू पीटिशन दाखल करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. पण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला.

पुनर्विचार याचिका दाखल होण्याबाबत निर्णय झाल्याशिवाय कुलभूषण जाधव यांची फाशी रोखण्यात यावी, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं होतं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!