
स्थैर्य, सातारा, दि. 14 नोव्हेंबर : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे
यावेळी चित्रकार सौ स्मिता कोरपे, एकांक नलवडे आणि शिल्पा चिटणीस यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रसिद्ध चित्रकार आणि संस्कृती कला अकादमीचे प्रमुख प्रसाद चव्हाण यांच्या हस्ते आणि लोकमतचे वृत्तसंपादक हणमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवसाच्या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत प्रदर्शन खुले असून रसिकांनी या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पत संस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे

