स्थैर्य, फलटण, दि. २६: पै. प्रवीण सरक यांची सातारा जिल्ह्यामधून गादी विभागातून होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मिरगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मिरगाव ता. फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवृत्ती खताळ यांच्या शुभहस्ते पै. प्रवीण सरक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक, कोंडिबा सरक, विकास सोसायटीचे चेरमन तायाप्पा सरक, वेताळ सरक, शिवाजी करे, उपसरपंच महादेव खताळ, बाळु मदने, संपत बापु सरक, वेताळबाबा देवस्थानचे महाराज हनुमंत सरक, महाराष्ट्र चॅम्पियन राहुल सरक यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन विकास सरक व दत्ता जानकर यांनी केले. कोरोनाच्या पारशभुमीवर सर्वांनी सोशल डिस्टंट ठेवून व मास्कचा वापर करून काळजी घेतली व प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले.