दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२३ | फलटण |
एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची महती गायली गेली आहे. आई वडील हे आपल्या आयुष्यातले पहिले गुरू असतात आणि हेच आपल्या पाल्यांना कळावे तसेच आई-वडिलांचे ऋण आपल्या आयुष्यातील लक्षात यावेत यासाठी तिरंगा पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून आई-वडिलांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी पालक अक्षरशः भावुक झाले होते.
तिरंगा पब्लिक स्कूल नेहमीच मुलांमध्ये संस्कार, संस्कृती रूजावी यासाठी प्रयत्नशील असते. गुरुपौर्णिमा साजरी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन केले. आई-वडिलांना हार घालून ओवाळले.
यावेळी संस्थेचे चेअरमन रणजित शिंदे सर यांनी संस्था मुलांमध्ये कशाप्रकारे संस्कार करते, याचे मार्गदर्शन केले. त्यावेळेस उपस्थित संस्थेचे सचिव मनोज गावडे, रेखा गावडे, रजनी शिंदे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभाऊ गावडे यांना सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गलांडे मॅडम यांनी केले. तसेच तिरंगा पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. जोेतिबा सुरवसे यांनी सर्व पालकांचे आभार मानले. हा कार्यक्रम पाहून पंचक्रोशीतील सर्व पालक संस्थेचे कौतुक करत आहेत.